...तर मंत्री सतेज पाटील व खासदार मंडलिक उद्योग बंद करत आहेत
schedule07 Aug 21 person by visibility 943 categoryराजकीय

माजी खासदार धनंजय महाडिक यांची टीका
आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर - हसन मुश्रीफ साहेब त्यांचे विरोधक संजय बाबा घाटगे यांना मदत करत आहेत. आमचे विरोधक मात्र आम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांच्यावर केली केली.
महाडिक म्हणाले, 'आमदार, खासदार यांचे पत्र आम्ही दुसऱ्याच्या कल्याणासाठी देतो मात्र मंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांनी आमचा साखर कारखाना बंद करण्यासाठी पत्र दिले आहे. जिल्ह्यात अनेक विरोधक होते. त्यांनी सहकार्याचे राजकारण केलं मात्र आम्हाला आमचे विरोधक सहकारी साखर कारखाना बंद करायचं पाठीमागे लागले आहेत असाही टोला महाडीक यांनी दिला.
आम्ही महाडिक आहोत घाबरणार नाही मात्र आमच्या ठिकाणी सर्वसामान्य कोण असतं तर काय झालं असतं याची कल्पना न केलेली बरी असेही महाडिक म्हणाले. आम्ही विरोधक असले तरी चांगल्या गोष्टीला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे मात्र विरोधकांनी विरोध कुठे करायचा या गोष्टीचा विचार करावा. अशी टीकाही महाडीक यांनी केली