Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

शिरोळ तालुक्यात राजरोस अवैद्य वाळू उपसा ?

schedule30 Apr 25 person by visibility 69 categoryगुन्हे

शिरोळ तालुक्यात राजरोस अवैद्य वाळू उपसा ?
महसूल प्रशासनाने कारवाई करावी : प्रवीणभाई माणगावे
शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ तालुक्यात वाळू तस्करांकडून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध्य वाळू उपसा करून वाहतूक केली जात आहे. याचा नाहक त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अवैध वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच शासनाने आदेश दिलेल्या घरकुल बांधकामासाठी मिळणारी पाच ब्रास वाळू ठेकेदारांकडून वेळेत मिळत नाही. त्यामुळे घरकुलांची कामेही रखडली आहेत. याकडे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शिरोळचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी जातीने लक्ष घालून अवैद्य वाळू उपशावर कारवाई करावी अशी मागणी जनता दल सेक्युलरचे राज्य सरचिटणीस प्रवीणभाई माणगावे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 
शिरोळ तालुक्यात कृष्णा नदी काठावर मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून हा वाळू उपसा केला जात आहे. याबाबत स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे वाळू तस्करांना अभय मिळत आहे. 
महसूल विभागाच्या मुक संमतीने रात्री१० ते सकाळी ६ या वेळेत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार घरकुल बांधकाम करणाऱ्या नागरिकांना मोफत देण्यात येणारी पाच ब्रास वाळू वेळेत मिळत नाही. त्यामुळे घरकुल बांधकामाची कामे रखडली आहे. घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांना तात्काळ वाळू मिळणे गरजेचे आहे. याकरिता तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी याकामी जातीने लक्ष घालून अवैद्य वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 
सदर निवेदन देताना जनता दल सेक्युलरचे ज्येष्ठ नेते बजरंग कुंभार, शिरोळ तालुकाध्यक्ष शिवाजी मोडके पाटील, अण्णासाहेब मगदूम, शरद चौगुले, अल्लाबक्ष चौगुले, विनायक लोंढे, सचिन मोकाशी, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes