विनय सहस्रबुद्धे यांना पोलीस महासंचालक यांचे पदक जाहीर
schedule30 Apr 25 person by visibility 75 categoryराजकीय

*पोलीस निरीक्षक विनय सहस्रबुद्धे यांना महाराष्ट्र दिनी गुणवत्ता सेवेबद्दल मा.पोलीस महासंचालक यांचे पदक जाहीर*
कोल्हापूर :
सांगली येथील रहिवासी असलेले भारत राखीव बटालियन 3, कोल्हापूर मधील दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलीस निरीक्षक विनय विनायक सहस्त्रबुद्धे व पोलीस शिपाई संग्राम पाटील यांना महाराष्ट्र दिनानिमित्त सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील बिनतारी संदेश प्रवर्गात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना मा. पोलीस महासंचालक यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी भारत राखीव बटालियन क्रमांक 3 कोल्हापूर येथे होणाऱ्या विशेष संचलनात सन्मानचिन्ह प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.