Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

परदेशात शिक्षण आणि नोकरीच्या संधी मार्गदर्शन मेळावा

schedule30 Apr 25 person by visibility 238 categoryराजकीयशैक्षणिक

ओबीसी जनमोर्चा, कोल्हापूर
राजर्षी छत्रपती शाहू करिअर गायडन्स् 
“परदेशात शिक्षण आणि नोकरीच्या संधी “ मार्गदर्शन मेळावा.
कोल्हापूर ;
         सर्वाधिक लोकसंख्या असलेला जगातील सर्वात मोठा आणि तरुणांचा देश म्हणून भारत देश जगभर ओळखला जातो.कोट्यावधी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. परंतु देशात बेरोजगारीचे संकट मोठे आहे. कुशल व अर्धकुशल, अकुशल हातांना सद्या रोजगार मिळताना दिसत नाही. उच्च शिक्षित इंजीनियरिंग, कृषी, नर्सिंग, फार्मसी, तसेच विज्ञान अभ्यासक्रमातील पदविका, पदवी. आणि आय.टी.आय आदी क्षेत्रातील कौशल्य शिक्षण असूनही बेरोजगारांच्या टोळ्या निर्माण होत आहेत. सरकारी नोकरीतील प्रचंड स्पर्धा, खासगी कंपनीत नोकरी मिळालीच तर समाधानकारक वेतन मिळत नाही. अशा बेरोजगार तरुणांना “परदेशातील शिक्षणाच्या न नोकरीच्या संधी” यावर ओबीसी जनमोर्चा प्रणित “राजर्षी छत्रपती शाहू करिअर गाईडन्स” च्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
        या शिबीरात नवी मुंबई येथील मान. भूषण रामटेके हे मार्गदर्शन करणार आहेत. आजपर्यंत भुषण रामटेके यांनी महाराष्ट्रातील शेकडो तरुणांना परदेशात शिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अगदी आय.टी.आय. झालेल्या विद्यार्थ्यांनाही लाखो रूपयांच्या नोकरीच्या संधी मिळवून दिल्या आहेत. यासाठी विविध देशांतील भाषांचे कोर्स, विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रिया, परकिय देशांच्या स्कॉलरशिप, फ्रिशिप, कर्ज योजना इत्यादी संदर्भात विद्यार्थी-पालक यांचेशी थेट संवाद मान. भुषण रामटेके साधणार आहेत.
        कोल्हापूरात  ४ मे २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वा. या वेळेपर्यंत शिवाजी पार्कातील “विद्या भवन” या कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभागृहा मध्ये या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
       कोल्हापूरातील तरुण - तरुणींनी  या मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा. यासाठी प्रथम नोंदणी आवश्यक आहे.

आजच्या पत्रकार परिषदेस सर्वश्री दिगंबर लोहार, शिवाजी माळकर, ज्ञानेश्वर सुतार,विजय घारे, सुनील गाताडे, चंद्रकांत कोवळे, बाबासाहेब काशिद, मोहन हजारे, सुनील महाडेश्वर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes