खासबागची भिंत कोसळून महिला ठार
schedule25 Jul 23 person by visibility 250 categoryगुन्हे

कोल्हापूर : खासबाग मैदान केशवराव भोसले नाट्यगृह जवळील भिंत कोसळून एक महिला ठार झाली.
अश्विनी आनंदा यादव (वय ५९ रा. साईपार्क भोसलेवाडी) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तर संध्या तेली (वय २८) यांना थोडीफार दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
एका पुरस्कार वितरण समारंभात या दोन महिला सहभागी झाल्या होत्या. सायंकाळच्या दरम्यान या महिला बाथरूमला गेले होत्या. त्या परत न आल्याने मुलीने आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी दोघींना बाहेर काढले.
अश्विनी यादव यांचा उपचार सुरू असताना छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात मृत्यू झाला.
