Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

जेष्ठमध आणि अश्वगंधा कोरोनाला प्रतिबंध करते....जर्मनीमध्ये संशोधन...

schedule24 May 20 person by visibility 739 categoryआरोग्य

कोल्हापूर: द फायर: विशेष प्रतिनिधी: डॉ. सुनील पाटील

कोरोनाने जगभर थैमान घातले आहे.विशेषत: जर्मनीमध्ये कोरोना महामारीचे प्रमाण जास्त होते. तेथे कोरोना प्रतिबंधसाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. येथील डॉ. रॉन श्रोटस हे गेली ३५वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टीस करतात. त्यांनी १४६ रुग्णावर जेष्ठमध आणि अश्वगंधा या दोन वनौषधी पासून बनवलेल्या गोळ्या रोज तीन वेळा आणि सर्दी ,खोकला, ताप ही लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना तीन गोळ्या तीन वेळा रोज दिल्या. यापैकी एक पेशंट ७२ वर्षाची महिला कॅन्सर ग्रस्त म्हणजे हाय रिस्क गटातली होती. ती१४ दिवसात बरी झाली.

डॉ. रॉन श्रोट्स यांचा असा दावा आहे की फ्रांकफुरत विद्यापीठात संशोधन  झाले आहे की जेष्ठमध मध्ये असणारे glycoserin हे कार्यकारी तत्व आणि अश्वगंधा मधील विदानिन हे कार्यकारी तत्व मानवी शरीरातील घसा आणि प्फुफुसाच्या पेशीमध्ये कोरोना व्हायरस शिरकाव करण्यास प्रतिबंध व अटकाव करते. त्यामुळे ही औषधे घेणाऱ्याचा कोरोना पासून प्रतिबंध होतो.या नव्या संशोधना मुळे आयुर्वेदाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

वैद्य सुनील पाटील

मो.9422049405

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id