Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

काँग्रेसकडून खातेवाटप जाहीर; सतेज पाटील-गृह राज्यमंत्री (शहर) व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री

schedule04 Jan 20 person by visibility 6951 categoryराजकारण

कोल्हापूर : द फायर प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष काँग्रेसकडून शनिवारी आपल्या मंत्र्यांची खातेनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली. काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या खातेवाटपात बाळासाहेब थोरात यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महसूल खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा सोपविण्यात आली आहे. तर बंटी ऊर्फ सतेज पाटील-गृह राज्यमंत्री (शहर) व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तसेच राज्यमंत्री असलेल्या विश्वजित कदम यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय, काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपूत्र अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. काँग्रेसच्या खातेनिहाय मंत्र्यांची यादी काहीवेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता थोड्याचवेळात इतर दोन पक्षांसोबत ही यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसची खातेनिहाय यादी पुढीलप्रमाणे: बाळासाहेब थोरात –महसूल, अशोक चव्हाण- सार्वजनिक बांधकाम, नितीन राऊत- ऊर्जा, विजय वड्डेटीवार- ओबीसी ,खार जमिनी,मदत आणि पुनर्वसन, के.सी.पाडवी- आदिवासी विकास, यशोमती ठाकूर- महिला व बालकल्याण, अमित देशमुख- वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक, सुनील केदार- दुग्ध विकास व पशुसंवर्धन,वर्षा गायकवाड- शालेय शिक्षण, अस्लम शेख- वस्त्रोद्योग,मस्तव्यवसाय, बंदरे, सतेज पाटील- गृह राज्यमंत्री (शहर) आणि विश्वजित कदम- कृषी आणि सहकार राज्यमंत्री.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id