मुंबईसह कोकणात येत्या 48 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
schedule15 Jul 20 person by visibility 497 categoryपर्यावरण
पुणे: द फायर: प्रतिनिधी: मुंबई, ठाणे परिसरासह संपूर्ण कोकणात येत्या 48 तासात मुसळधार पाऊस होईल. या काळात वादळी वारे वाहतील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या पावसाला अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. परिणामी वरील भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या अनेक अन्य भागात सुद्धा पावसाळी वातावरण आहे. हे मात्र बहुसंख्य ठिकाणी तुरळक सरी पडत आहेत. अनेक ठिकाणी सरासरी एवढा अध्याप पाऊस झालेला नाही.