Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

अंतराळ संशोधनात भारताची ऐतिहासिक कामिगिरी; ‘इस्रो’चे मंगळयान पाच वर्षे आहे कार्यरत

schedule25 Sep 19 person by visibility 428 categoryतंत्रज्ञान

मुंबई : भारतासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की अवघ्या 6 महिन्यांसाठी पाठवण्यात आलेलं मंगळयान गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेली ही कामगिरी जगातील कोणत्याही देशाला करता आली नव्हती.

भारताच्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळयान लाँच केलं होतं. त्यानंतर हे यान ११ महिन्यांनी मंगळाच्या कक्षेत पोहचलं होतं. हे यान फक्त ६ महिन्यांसाठी मंगळाच्या कक्षेत पाठवण्यात आलं होतं. मार्स ऑर्बिटर मिशन आतापर्यंत सुरू असून मंगळाची माहिती आजही इस्रोकडे पाठवत आहे. मंगळयान मंगळाच्या कक्षेत २४ सप्टेंबर २०१४ ला पोहचलं होतं. याला ५ वर्ष झाली. आतापर्यंत मंगळयानाने १ हजारपेक्षा जास्त फोटो पाठवले आहेत. या पाच वर्षात मंगळयानाकडून इस्रोच्या डाटा सेंटरला ५  टीबीपेक्षा जास्त डाटा मिळाला आहे. याचा उपयोग मंगळाच्या अभ्यासासाठी होत आहे. जगातील सर्वात कमी खर्चात हे मोहीम आखण्यात आली होती. यासाठी फक्त ४५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

सध्या मंगळयान मंगळाभोवती फिरत आहे. मंगळापासून किमान 421 किलोमीटर ते कलमा 76 हजार किलोमीटरवरून हे यान फेरी मारते. पाच वर्ष फेऱ्या मारल्यानंतरही त्याचे काम सुरू आहे. ही बाब जगभरातील शास्त्रज्ञांना चकीत करणारी आहे. अद्यापही यान सुस्थितीत असल्याचं इस्रोनं म्हटलं आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id