Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काजू कारखानदारांच्या समस्या व अडचणीबाबत : समरजितसिंह घाटगे यांचे जिल्हा प्रबंधक यांना निवेदन

schedule10 Jul 20 person by visibility 479 categoryकृषीराजकारण

कोल्हापूर:द फायर:प्रतिनिधी:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काजू कारखानदारांच्या समस्या व अडचणीबाबत जिल्हा प्रबंधक राहुल माने याना भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी निवेदन दिले.यावेळी काजू कारखानदारांच्या विविध अडचणी व उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अशोक आण्णा चराटी, राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील,  राजे बँकेचे संचालक रविंद्र घोरपडे, दीपक मेंगाणे, विकास बांगडी, जयसिंग खोराटे ,प्रकाश कोंडुसकर विकास फळणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यात आजरा चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या  काजूची खरेदी कारखानदार करतात. व प्रक्रिया करून काजूगर उत्पादन करतात .त्याला देशासह परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक लोकांना रोजगार  मिळाला आहे. मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे काजू प्रक्रिया करणारे कारखानदार  आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. काजू कारखानदाराना राष्ट्रीयकृत बँका  कर्ज देताना इंडस्ट्रियल एन ए वगैरे तांत्रिक बाबी  लावतात . त्यामुळे या कारखानदारांना अतिरिक्त खर्च  सोसावा लागतो व  यामध्ये वेळ ही  वाया जातो.

शासन निर्णयानुसार काजू प्रक्रिया उद्योग कृषिपूरक उद्योग असल्यामुळे त्याला औद्योगिक एन ए ची गरज नाही. असे असताना राष्ट्रीयकृत बँका ते केल्याशिवाय कर्ज देत नाहीत. त्यामुळे ही अट रद्द करावी. व कर्जपुरवठ्यात सुलभता आणावी. या पार्श्वभूमीवर जे पॅकेज जाहीर झाले आहे. ते कॅश क्रेडिट कर्जाच्या बाकी वर वीस टक्के अशा प्रमाणात जाहीर केले आहे. तसे न करता एकूण कर्ज रकमेवर ते पॅकेज  मिळावे.कारण  बहुतेक सर्व कारखानदारांचे कर्ज या कालावधीत निरंक होते. त्यामुळे  त्याचा त्यांना लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे.

तसेच बँकेकडील तारणा आधारे प्लेज लोन मिळावे व लॉकडाऊन काळातील काम बंद असल्यामुळे चालू वर्षाचे या सर्व कर्जावरील व्याज माफ व्हावे. यासाठी जिल्हा प्रबंधक यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करावा . अशा निवेदनात मागण्या करण्यात आल्या आहेत.

काजू कारखानदारांचा प्रश्न मार्गी लागेल

यावेळी प्रतिक्रिया देताना समर्जीतसिंह घाटगे म्हणाले,काही दिवसांपूर्वी आजरा येथील भेटीवेळी  मी आणि अशोक अण्णा चराटी  आम्ही दोघांनी काजू कारखानदार यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी कोरोणा मुळे आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेल्या कारखानदारांना त्यांच्या कर्जबाबत न्याय व शासन पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी निश्‍चितपणे  प्रयत्न करणार असलेचे मी बोललो होतो त्या अनुषंगाने आज आपण निवेदन दिले आहे.जिल्हा प्रबंधक राहुल माने यांनी या प्रश्नात लक्ष घालनेचे आश्वासन दिले आहे.लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id