नौदलामध्येही महिलांना कायमस्वरुपी नेमणूक, सुप्रीम कोर्टाचे आदेश
schedule17 Mar 20 person by visibility 309 categoryमहिला
नवी दिल्ली: नौदलामध्येही महिलांना कायमस्वरुपी नेमणूक देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. ज्या महिला सध्या नौदलामध्ये अल्पकालीन नेमणूक म्हणून कार्यरत आहेत. त्या आता कायमस्वरुपी नेमणूक म्हणून कार्यरत राहतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. केवळ लिंगाच्या आधारावर सरकार महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करू शकत नाही, असे स्पष्ट करत येत्या तीन महिन्यांत महिलांना कायमस्वरुपी नेमणूक देण्यात यावी, असे आदेश सरकारला देण्यात आले आहेत.
कायमस्वरुपी नेमणुकीमध्ये महिला निवृत्तीपर्यंत नौदलामध्ये कार्यरत राहू शकते. सध्या अल्पकालीन नेमणुकीमध्ये महिलांना केवळ १० वर्षेच नौदलामध्ये सेवा करता येऊ शकते. त्यामध्ये गरजेप्रमाणे सरकार चार वर्षांची वाढ करू शकते. पण अल्पकालीन नेमणुकीमध्ये १४ वर्षांपुढे कोणत्याही महिलेला नौदलात सेवा बजावता येऊ शकत नाही.