Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

कोरोना व्हायरस : जॉनसन अँड जॉनसन करणार जुलैमध्ये मानवावर औषधाची चाचणी

schedule11 Jun 20 person by visibility 286 categoryनवनिर्मिती

न्यूयॉर्क : जगप्रसिद्ध औषध कंपनी जॉनसन अँड जॉनसनने कोरोना व्हायरसवर लस (व्हॅक्सिन) शोधल्याचा दावा केला आहे. या लसीच्या आतापर्यंतच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या व्हॅक्सिनची आता मानवावर जुलैमध्ये चाचणी घेण्यास सुरूवात करणार आहोत, असे कंपनीकडून सांगण्यात येते.

हे व्हॅक्सिन कोरोनावर 100 टक्के उपायकारक ठरेल असा अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही. मात्र त्याआधीच अमेरिकेने जॉनसन अँड जॉनसन सोबत या व्हॅक्सिनसाठी करार केला आहे. या करारानुसार कंपनी अमेरिकेसाठी या व्हॅक्सिनचे 1 बिलियन डोस तयार करणार आहे. कंपनी हा प्रयोग अमेरिका आणि बेल्जियममध्ये करणार आहे. यासाठी कंपनीने 18 ते 65 या वयोगटातील 1,045 जणांची निवड केली आहे. वृद्धांवर हे व्हॅक्सिन परिणामकारक आहे की नाही हे तपासण्यासाठी 1045 जणांमध्ये काही 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकेतीलच मॉडर्ना ही बायोटेक कंपनीही व्हॅक्सिन बनवण्यामध्ये पुढे आहे. करोनाच्या 600 रुग्णांवर कंपनीने आपल्या व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. रुग्णांवर याचा काय परिणाम होतो त्याचा अभ्यास कंपनीकडून सुरू आहे. जगभरात सध्या जवळपास 10 व्हॅक्सिनची मानवावर चाचणी सुरू आहे. सुरक्षित आणि परिणामकारक व्हॅक्सिन येण्यास ट्रायल सुरू झाल्यानंतर साधारणपणे 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id