जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन,सायंकाळपर्यंत पाच बंधारे पाण्याखाली
schedule04 Aug 20 person by visibility 572 categoryपर्यावरण
कोल्हापूरःद फायरःप्रतिनिधीः प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर काल सोमवारी आणि आज मंगळवारी दिवसभर पावसाने दमदार पुनरागमन केले .यामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच नद्यांच्या पातळीतही वाढ होते आहे .त्यामुळे आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारासह एकूण पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती .त्यामुळे पिके धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. परंतु काल पावसाचे पुनरागमन झाले आणि आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे .परिणामी नद्यांच्या पातळीत वाढ होते आहे. पंचगंगा नदीची पातळी वाढू लागली असून त्यामुळे कसबा बावडा जवळील राजाराम बंधारा यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे .दीर्घ प्रतीक्षा कालावधीनंतर होणारा हा पाऊस पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.